विद्यार्थी मित्र व पालक सस्नेह नमस्कार!
आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जे पदवीचे (डिग्रीचे) कोर्सेस आहेत व या कोर्सेस ला शिकवला जाणारा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी पुरेसा नाही.
व्यावसायिक करिअर म्हणजे एकतर नौकरी किंवा स्वतःचा व्यवसाय.
पण, आज जो अभ्यासक्रम आहे त्यावर ना तर नौकरी मिळते ना तर स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. आज कॉर्पोरेट क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या डिग्री ला जवळ जवळ शून्य किंमत आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये किती सॉफ्ट स्किल्स विकसित आहेत व तो विद्यार्थी माझ्या कंपनीसाठी काय मूल्यवान योगदान देऊ शकतो हे बघितलं जातं.
जेव्हा विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे क्षेत्र निवडतो तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना साधा व्यापार आणि उद्योजकता यातील बेसिक फरक सुद्धा माहीत नसतो आणि परिणामी त्यांना व्यवसायात यश मिळत नाही.
आज खरी गरज आहे ती ही की, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेनुसार व क्षमतेनुसार नौकरी किंवा व्यापार किंवा उद्योजकता असे क्षेत्र निवडले पाहिजे. पण, 98% कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभा व क्षमता काय आहेत यावर विश्लेषण (Analysis) होत नाही.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेनुसार व क्षमतेनुसार त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतच सॉफ्ट स्किल्स आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित केली गेली पाहिजेत जेणेकरून विद्यार्थी त्याच्या डिग्री च्या शिक्षणा नंतर नौकरी किंवा व्यवसाय या क्षेत्रात 100% यशस्वी होईल.
शेवटी एवढेच मनोगत व्यक्त करावे वाटते की,
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रतिभेनुसार (Talent) व क्षमतेनुसार (Potential) शैक्षणिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त
- विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स विकसित करून डिग्री (पदवी) झाल्या बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदस्थ नौकऱ्या उपलब्ध करून देणे तसेच
- उद्योजकतेमध्ये (Entrepreneurship मध्ये) उद्योजकतेचे सखोल प्रशिक्षण देऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनवणे.
ही दोनच ध्येय डोळ्यासमोर ठेवून A&G महाविद्यालय निलंगा (बी.कॉम डिग्री कॉलेज) ची स्थापना केली आहे.
माझी विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की कृपया आमच्या या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन तुमचे व्यावसायिक करिअर सुरक्षित करून घ्या.
धन्यवाद !
उद्दिष्टे
