Health & Cultural Department

आरोग्य आणि सांस्कृतिक विभाग

आज जे महत्व शैक्षणिक गुणवत्तेला दिले जात आहे तेवढेच महत्व आरोग्य आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी दिले गेले पाहिजे. पण, वास्तविक परिस्थिती खूपच विरुद्ध आहे.

आजचा विद्यार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या जेवढा विकसित असायला पाहिजे तेवढा तो निश्चितच नाही.

आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अपयश व अपमान पचवण्याची मानसिकताच विकसित झाली नाही. एक तर ते आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलतात किंवा चुकीच्या मार्ग अवलंबतात. आणि या साठीच A&G महाविद्यालयात आरोग्य आणि सांस्कृतिक विभाग सुरू करण्यात आला आहे.

या विभागा मार्फत मानसिक व शारीरिक कस लागणाऱ्या मैदानी स्पर्धांचे आयोजन केले जाते व विद्यार्थ्यांकडून कसून सराव करून घेतला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेव्हर गिव्ह अप हा दृष्टिकोन विकसित होतो. या विभागा मार्फत मॅरेथॉन, सायक्लोथॉन, ट्रायथलॉन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात.

त्याच बरोबर सांस्कृतिक विभाग हा विद्यार्थ्यांमध्ये आयुष्याची जीवन मूल्ये विकसित करतो. आपली संस्कृती व थोर महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी रुजविण्यासाठी विविध कार्यशाळा व सहली या विभागा मार्फत आयोजित केल्या जातात.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

Download Broucher